हिवाळी अधिवेशन केवळ दोनच आठवडे चालणार; कालावधी वाढविण्याची मागणी

0

मुंबई-राज्याच्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या १९ ते ३० नोव्हेंबर दरम्यान होणार आहे. यावर्षी केवळ दोन आठवडेच अधिवेशन चालणार आहे. त्यातही प्रत्यक्षात ९ दिवसच कामकाज होणार आहे. आज विधानसभा कामकाज समितीची बैठक झाली. यावेळी ही माहिती देण्यात आली. दरम्यान अधिवेशनाचे कालावधी वाढविण्यात यावे अशी मागणी होत आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय यांनी कालावधी वाढविण्याची मागणी केली आहे. गुरुनानक जयंतीच्या दिवशी देखील कामकाज सुरु राहणार आहे.