नियोजित समाज मंदिराच्या कामास विलंबामुळे ग्राममभेत निर्णय; अंदाजे ५ कोटी ५० लाखांचा खर्च
जुन्नर । नारायणगावचे ग्रामदैवत श्री मुक्ताबाई देवी व काळोबा देवस्थान ट्रस्टच्या वतीने नियोजित समाजमंदिराच्या बांधकामास ग्रामस्थांनी एकमुखी संमती दिली होती. मात्र याबाबत देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष व सभासदांनी लाखो रुपयांचा हिशोब अद्याप दिलेला नसून त्यांनी हा हिशोब दसर्यापर्यंत न दिल्यास संबंधितांवर कायदेशीर कार्यवाही करण्याचा ठराव या ग्राममभेत घेण्यात आला आहे.
मुक्ताबाई देवीच्या मंदिरात नारायणगाव आणि वारूळवाडी ग्रामस्थांची ग्रामबैठक रविवारी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत ब्रह्मे घोडेकर असोसिएटचे आर्किटेक सचिन घोडेकर यांनी नियोजित समाजमंदिराच्या संपूर्ण बांधकामाची माहिती दिली.
देवस्थानचे सध्याचे ट्रस्टी संतोष खैरे आणि योगेश पाटे यांनी सांगितले की, सध्याचे मंगल कार्यालय कार्यक्रम व सामुदायिक लग्नासाठी कमी पडत असल्याने ते पाडून नियोजित नवीन सर्व सुखसुविधा असलेले दोन मजली ४८ हजार स्वेअर फुट बांधकाम करण्यात येणार आहे. या समाजमंदिरात लग्न सोहळा, सांस्कृतिक भवन, विविध धार्मिक सामाजिक कार्य होतील, या कामासाठी अंदाजे ५ कोटी ५० लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. राज्य सरकारकडून ३ कोटी रुपये व उर्वरित रक्कम देवस्थानकडून खर्च करावा लागणार आहे.
दसर्यापर्यंत हिशोब देण्याची मागणी
राजेंद्र माताडे म्हणाले, ज्या पतसंस्था देवस्थानच्या ठेवीची माहिती देत नसेल तर सहाय्यक निबंधक यांच्याकडे तक्रार करावी. तसेच संबधितांवर कायदेशीर कार्यवाही करण्यासाठी ट्रस्टने कायदेशीर सल्लागाराची नेमणूक करावी. संतोष खैरे म्हणाले, येत्या ३० सप्टेंबरला येणार्या दसर्यापर्यंत संबंधितांना ग्रामस्थांच्या वतीने एक संधी देऊ, तरीही सविस्तर हिशोब नाही आला तर त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करू, येत्या ५ ऑक्टोबरला पुन्हा ग्रामबैठक घेऊन पुढील निर्णय घेण्यात येतील, आत्तापर्यंत १८ लाख रुपये खर्च केला आहे. पुढील कामांसाठी निधी देऊन काम पूर्ण केले जाईल, अशी माहिती आशिष माळवदकर यांनी दिली.
ग्रामस्थांची उपस्थिती
या ग्रामबैठकीत एकनाथ शेटे, अशोक पाटे, संतोष वाजगे, विकास तोडकरी, दादाभाऊ खैरे, पंढरीनाथ पाटे, गणपत कोकणे, आल्हाद खैरे, एम. डी. भुजबळ, राजाराम पाटे, वारूळवाडीचे उपसरपंच जंगल कोल्हे, आशिष माळवदकर, संतोष दांगट, गणेश पाटे, रामदास अभंग, अशोक गांधी, राजेंद्र बोरा, रोहिदास केदारी, दाजी कोर्हाळे, तौसिफ कुरेशी, शंकर जाधव, रशीद इनामदार, अरिफ आत्तार, राजेश गाडेकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
कायदेशीर कारवाईचा इशारा
देवस्थानकडे दोन वर्षापूर्वी १ कोटी ७६ लाख रुपये होते, असे त्यावेळी असलेल्या संचालक मंडळांनी सांगितले होते. एप्रिल २०१७च्या मुक्ताबाई देवीच्या यात्रेनंतर २६ एप्रिलला सविस्तर हिशोब दिला नाही. सर्व ग्रामस्थांसमोर अध्यक्ष चंद्रशेखर कोर्हाळे, अशोक पाटे, दयानंद पाटे, मुरलीधर फुलसुंदर, देविदास भुजबळ यांनी लेखी राजीनामे दिले होते. त्यानंतर आजपर्यंत सविस्तर हिशोब देण्यात आला नाही. शिवाजीराव खैरे म्हणाले, देवस्थानचा हिशोब देण्याचे जाहीर करूनही हिशोब देण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत असतील तर सर्व ग्रामस्थांनी त्यांच्या घरी जाऊन जाब विचारावे. त्यापुढेही संबंधितांनी माहिती न दिल्यास
कायदेशीर कार्यवाही करावी, असा ठराव ग्रामस्थांनी मंजूर केला.