हिस्से वाटणीवरून आईसह मुलास मारहाण

0

भुसावळ- घराच्या हिस्से वाटणीवरून वाद झाल्याने मुलासह आईस मारहाण केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. 1 रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास ही घटना घडली मात्र 7 रोजी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. राजू चंदू कनोजे (न्यू सातारा, गरूड प्लॉट, भुसावळ) यांच्या तक्रारीनुसार काकांशी हिस्से वाटणीचा वाद सुरू असताना काकांचा मुलगा रोहित हा 1 रोजी रात्री 10 वाजता घराबाहेर येवून दारूच्या नशेत शिवीगाळ करून घर खाली करण्याची धमकी देत असल्याने त्यास जाब विचारला असता संशयीत आरोपी राजकुमार छोटेलाल कनोजे, मंगला राजकुमार कनोजे व रोहित राजकुमार कनोजे यांनी चापटा-बुक्क्यांनी मारहाण केली तसेच भांडण सोडण्यासाठी तक्रारदाराची आई दुर्गाबाई आल्यानंतर आरोपींनी तिच्या डाव्या हातावर लाकडी दांड्याने मारहाण करून दुखापत केल्याने तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.