हींगोणे वाळू प्रकरण उपोषण सोडण्यासाठी तहसीलदारांचे पत्र

0

दोन्ही गावकरी मंडळी घेणार “त्या” वर निर्णय

चाळीसगाव – हींगोणे सिम वाळू चोरी प्रकरण बाबतच्या दोन्ही गावकऱ्यांनी सुरू केलेल्या उपोषणाच्या आजच्या पाचव्या दिवशी महसूल विभागाने संबंधितावर कारवाई करण्यात येत असले बाबत पत्र देण्यात आले. चाळीसगाव नायब तहसीलदार नानासाहेब आगळे व मंडळ अधिकारी आर एन कुलकर्णी यांनी हे चारपानी पत्र उपोषण स्थळी ग्रामस्थांना दिले आहे. यात वाळू चोरी बाबतचा अहवाल, करण्यात येत असलेल्या कारवाई बाबतचे पत्र तसेच अनधिकृत गौणखनिज (वाळू) वाहतुकीबाबत दंडनीय नोटीस अशा कागदपत्रांचा सहभाग असून नायब तहसिलदार यांनी उपोषण स्थळी ग्रामस्थांना दिले आहे. यावेळी माजी जि.प. सदस्य सुभाष चव्हाण, पंचायत समितीचे उपसभापती संजय पाटील, सरपंच ज्ञानेश्वर महाजन, बेलगंगा कारखान्याचे माजी संचालक बाळासाहेब पाटील, सुरेश महाराज,सयाजी पाटील, शांताराम पाटील, अरविंद चव्हाण यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. या प्रस्तावावर दोन्ही गावांचे ग्रामस्थसमोर त्या प्रस्तावावर निर्णय घेऊ अशी माहिती उपोषणकर्ते यांनी यावेळी व्यक्त केली आहे.