ही अभिनेत्री ‘संजू’ चित्रपटात संजय दत्तच्या आईच्या भूमिकेत

0

मुंबई- २९ जून रोजी बॉलीवूड अभिनेता संजय दत्त यांच्या जीवनावर आधारित ‘संजू’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत असून आज बुधवारी ‘संजू’चे ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटात संजय दत्तच्या भूमिकेत रणबीर कपूर आहे तर संजय दत्तचे वडील सुनील दत्त यांच्या भूमिकेत परेश रावल आहे. या चित्रपटातील विशेष बाब म्हणजे कधीकाळी संजय दत्त सोबत हिरोईनच्या भूमिकेत असणारी मनीषा कोयराल ही अभिनेत्री ‘संजू’ चित्रपटात संजय दत्तच्या आई नर्गिस दत्तच्या भूमिकेत आहे.

या चित्रपटात केले काम

२००० मध्ये आलेला भागी, १९९२ मध्ये आलेला यलगार या चित्रपटात संजय दत्त सोबत हिरोईन म्हणून भूमिकेत मनीषा कोयराला होती. याच चित्रपटात परेश रावल संजय दत्तचे वडील सुनील कपूरच्या भूमिकेत आहे. तसेच या चित्रपटात अनुष्का शर्मा, सोनम कपूर, दीया मिर्झा, विकी कौशल, संजय मांजरेकर, बोमन इराणी, जीम सर्भ यांची या चित्रपटात भूमिका निभावली आहे.