ही निवडणूक माझी शेवटची निवडणूक आहे: सुशीलकुमार शिंदे

0

सोलापूर : सध्या लोकसभा निवडणूक सुरु आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान झाले आहे तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान परवा होणार आहे. दरम्यान सोलापूरमधून महाआघाडीकडून माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे निवडणुकीच्या रिंगणात आहे, दरम्यान आज त्यांनी यापुढे आपण कोणतीच निवडणूक लढविणार नाही. ना आमदारकीची ना खासदारकीची अशी घोषणा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केली.

आज सोलापूर शहरातील काँग्रेस भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आमदार प्रणिती शिंदे, काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले, माजी महापौर यु.एन. बेरिया आदी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

यंदाच्या निवडणुकीत लोकांचे प्रेम मिळत आहे. सोलापूरमधील मतदारांनी आतापर्यंत भरघोस सहकार्य केले आहे. आपण सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडून येऊच असा दावाही शिंदे यांनी यावेळी केला. याचवेळी सुशीलकुमार शिंदे यांनी भाजप सरकारवर जोरदार टिका केली. भाजपकडे विकासाचा अजेंडाच नाही. रोज नवनवे काही तरी घेऊन मतदारासमोर जाणारे लोकप्रतिनिधी जनतेची दिशाभूल करीत आहेत असेही शिंदे म्हणाले.