हुंड्यासाठी पत्नीचा छळ ; भुसावळातील शिक्षक पतीला छत्तीसगड पोलिसांकडून अटक

0

भुसावळ- लग्नात मान-पान व हुंड्यापोटी सोने-चांदी न दिल्याने छत्तीसगडमधील रहिवासी व भुसावळातील माहेर असलेल्या विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी भुसावळातील उच्च शिक्षित पतीसह सासू व कुटुंबियांनी छळ केल्याप्रकरणी भुसावळातील रहिवासी असलेल्या अमरावती येथे क्लासमध्ये शिक्षक म्हणून नोकरीस असलेल्या सौरभ अग्रवाल यास मंगळवारी अटक केली आहे.

आरोपी शिक्षक पतीला अटक
छत्तीसगडमधील दुर्ग जिल्ह्यातील मोहन नगर पोलिस ठाण्यात विवाहिता पूजा अग्रवाल यांचे वडील मुकेश अग्रवाल यांनी आरोपींविरुद्ध विवाहितेचा शारीरीक व मानसिक छळ केल्याप्रकरणी तक्रार नोंदवली आहे. पूजाचा विवाह झाल्यानंतर अमरावतीमधील क्लासमधील शिक्षक असलेला पती सौरभ अग्रवाल, सासू सासू नीलम अग्रवाल, चुलत बहिण किशू अग्रवाल यांनी हुंड्यासाठी पूजाचा छळ केल्याचा आरोप आहे. लग्नानंतर माहेरी आलेल्या पूजाला सासरचे लोक घेण्यास आले नाही. वारंवार सांगूनही सासरच्या मंडळींनी लक्ष न दिल्याने सासरचयांनी दुर्ग येथील मोहननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. या प्रकरणी पोलिसांनी सौरभला अटक केली. छत्तीसगड पोलिसांनी भुसावळात येऊन कारवाई केल्याने खळबळ उडाली आहे.