हुंड्यासाठी लग्न मोडले ; मध्यप्रदेशातील दापोर्‍याच्या तिघांविरुद्ध गुन्हा

0

गुन्ह्यानंतर आरोपी झाले पसार ; अटकपूर्व जामिनासाठी केला अर्ज

रावेर- साखरपूडा झाल्यानंतर हुंड्याची मागणी करीत ती मान्य न केल्याने लग्न न मोडणार्‍या मध्यप्रदेशातील दापोर्‍याच्या तिघांविरुद्ध रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील आरोपींनी अद्याप पोलिसांनी अटक केली नसल्याने नाराजी व्यक्त होत असून दुसरीकडे आरोपींनी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्जदेखील केला आहे. रावेर पोलिसांनी मात्र आरोपींचा शोध घेतला असता ते पसार झाल्याचे सांगितले.

साखरपुड्यानंतर मोडले लग्न ; तिघांविरुद्ध गुन्हा
मध्यप्रदेशातील दापोरा येथील विनायक पाटील व मनिषा पाटील या दाम्पत्याचा उच्च शिक्षिीत मुलगा अंकुश पाटीलचा विवाह रावेर तालुक्यातील अजनाड गावातील प्रदीप पाटील यांच्या मुलीशी निश्‍चित करण्यात आला होता. 29 जुलै रोजी रीतीरीवाजाप्रमाणे अजनाड, ता.रावेर येथे मोठ्या थाटामाटात उभयंतांचा साखरपुडाही पार पडला. त्यासाठी भावी जावयाला दहा ग्रॅमची अंगठी व 40 ग्रॅमची चैन असा दीड लाखांचा ऐवजही देण्यात आला तर वधू पित्याने लग्नासाठी बर्‍हाणपूर शहरातील गुजर मंगल कार्यालय बुक करण्यात आले. साखरपुड्यानंतर दीड महिन्याच्या कालावधीनंतर विनायक पाटील यांना भ्रमणध्वनी करून प्रदीप पाटील यांनी अंकुश यास जर्मनीला जायचे आहे. त्यामुळे लग्न सहा महिने थांबविण्यास विनायक पाटील यांनी सांगितले तर त्यानंतर पुन्हा लग्नाची तारीख 21 डिसेंबर 2018 ठरवून पुन्हा लग्नाची लगबग सुरू झाली तर अचानक 8 नोव्हेंबर 2018 रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास विनायक पाटील यांनी वधू-पित्यास दूरध्वनी करून चोरवडला बोलावले. यावेळी विनायक पाटील व मनीषा पाटील यांनी लग्नासंदर्भात चर्चा करावयाची असल्याचे सांगितल्याने वधू-पित्याच्या वडीलांनी त्यांना मोठे भाऊ जगदीश पाटील यांच्याकडे केर्‍हाळे येथे आणले. यावेळी पाटी लाम्पत्याने आम्हाला मुलासाठी इनोव्हा कार घेण्यासाठी 25 लाख रूपये द्यावे लागतील, आमचा मुलगा आयटी कंपनीत मोठ्या हुद्यावर असून त्याच्या भविष्यातील जर्मनी येथील रहिवासासाठी त्याला लागणार्‍या साहित्यासह त्याला संसार उभा करायचा आहे. घर घ्यायचे आहे. त्यावेळी सुध्दा रक्कम द्यावी लागेल, असे सांगितले तसेच तुम्ही असे करणार नसाल तर हे लग्न मोडले म्हणून समजा, असे सांगत त्यांनी लग्न मोडले. या प्रकरणी 12 नोव्हेंबर 2018 रोजी रीतसर पोलिस स्थानकात पाटील दाम्पत्यास त्यांच्या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रार देवूनही 13 दिवस उलटले मात्र आरोपींना अटक करण्यात रावेर पोलिस यश आलेले नाही. दरम्यान, वधू-पित्याच्या तक्रारीनुसार विनायक पाटील यांनी फोनवरून तुम्ही समाजात लग्न मोडल्याची बाब सांगू नका अन्यथा तुमच्या मुलीचे व माझ्या मुलाचे फोटो मोबाईलमध्ये असून त्यात संगणकाद्वारेे फेरबद्दल करून तुमची व तुमच्या मुलीची सामाजिक बदनामी करू, अशी धमकी दिल्याचा आरोपही करण्यात आला. दरम्यान, रावेर पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे म्हणाले की, आरोपींचा शोध घेतला असून ते पसार झाले आहेत, त्यांचा पोलिसांकडून कसून शोध घेण्यात येत आहे. आरोपींनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केल्याच्या वृत्ताला त्यांनी दुजोरा दिला.