हुक्कापार्लरवर कारवाई करण्याची मनसेची मागणी

0

उल्हासनगर – मुंबईत घडलेल्या भीषण अग्निकांडामुळे निष्पाप नागरीकांचा बळी गेला असून उल्हासनगर शहरात अशी दुर्देवी घटना घडू नये याकरीता बेकायदा हॉटेल,बीयरबार, पब, हुक्कापार्लर यांच्यावर महापालिकेने कारवाई करावी अशी मागणी मनसेने निवेदनाद्वारे पालिका आयुक्तांकडे केली आहे. त्यावेळी उल्हासनगर मनसे शहर अध्यक्ष संजय घुगे, प्रदिप गोडसे यांच्यासह दिलीप थोरात, मैनुद्दीन शेख, शालीग्राम सोनावणे, मुकेश शेटपलानी, सचिन बेंडके, रूपचंद पवार आदी उपस्थित होते.

उल्हासनगर शहरातील काही हॉटेल,बीयरबार, पब, हुक्कापार्लर नागरीकांच्या मालमत्ता व जिवीतहानीस कारणीभुत ठरू शकते. अशा संबंधीतांना महापालिकेची अग्निशमन परवानगी, मालमत्ता कर आणि नगररचना विभागाची परवानगी तसेच पोलिस विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र घेतले नसल्यास राजरोसपणे सुरू असलेल्या या मनुष्यवधाच्या कारखान्यावर पालिकेने त्वरीत कारवाई करून हायकोर्टाच्या आदेशाचे पालन करावे अशा मागणीचे निवेदन मनसेने अतिरीक्त आयुक्त डॉ.विजया कंठे यांच्याकडे दिले आहे.