जळगाव । तत्कालीन पालिकेने हुडकोकडून घेतलेले कर्जांपेक्षा जास्त रक्कम महापालिकेने अदा केली आहे. यातून मार्ग काढण्यासाठी दिल्ली येथे केंद्रीय गृहनिर्माण सचिव नंदिता चॅटर्जी यांच्या दालनात बुधवारी बैठक झाली. याप्रसंगी हुडकोचे मुख्य कार्यकारी संचालक रविकांत, मुंबई नगरविकास विभागाचे अधिकारी श्री. गोखले, मनपा आयुक्ता जीवन सोनवणे, सीए अनिल शहा, लेखाधिकारी चंद्रकांत वांद्रे उपस्थित होते. या बैठकीत हुडकोने महापालिकाचा 2004 चा रिसेटलमेंट प्रस्ताव पुनर्जीवित करण्याचा ठराव फेटाळून लावत 341 कोटीच्या डिक्री नोटीसीच्या पुढे बोला असे बैठकीत सांगितले. त्यामुळे झोलेल्या बैठकीतून काहीच तोडगा काढण्याचा निर्णय न निघाल्याने ही बैठक निष्फळ ठरली आहे. या बैठकीतून तोडगा निघण्याची अपेक्षा होती मात्र बैठक निष्फळ ठरली आहे.
रिसेटलमेन्टचा प्रस्ताव यापूर्वीही हुडकोने नाकारला
तत्कालीन पालिकेने हुडकोकडून 140 कोटी 38 लाखाचे कर्ज घेतले होते. या कर्जाची परतफेड करतांना पालिकेने आतापर्यंत 290 कोटींपेक्षा अधिक रक्कम अतापार्यंत अदा केली आहे. तसेच हुडकोच्या कर्जप्रकरणी तीन-चार वर्षापूर्वी डीआरटीने यासंदर्भात महापालिकेला 340 कोटी 74 लाखांची डिकरी नोटीस बजावली होती. तसेच महापालिकेने हुडको कर्ज फेडण्यासाठी 2004 चा रिसटलमेंट प्रस्ताव हुडकोला दिला होता. परंतू हा प्रस्ताव हुडको मान्य केला नव्हता.
341 कोटींच्या डिक्री नोटीसवर बोला; हुडकोचा बैठकीत होरा
यानंतर महापालिकेकडून हुडकोला दर महिन्याला 3 कोटी 75 लाख रुपये दिला जाणारा हप्ता भरणे सुरूच होता. परंतू घेतलेल्या कर्जापेक्षा अधिक रक्कम भरली असून या हप्ताला स्थगिती मिळाविण्यासाठी महापालिकेने न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालयाने राज्यशासन, महापालिका व हुडको यांनी एकत्रित बैठक घेऊन 4 मे पूर्वी तोडगा काढण्याच्या सूचना केल्या होत्या. परंतू यावर शासनाकडून आधिक कार्यवाही सुरू असून बैठक घेण्यास नकरा दर्शविला होता. त्यानंतर पालकमंत्री चंदकांत पाटील तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर तोडगा काढण्यासाठी केंद्राकडे पत्र पाठविले होते. त्यावरून बुधवारी दिल्ली येथे केंद्रीय गृहनिर्माण सचिव नंदिता चॅटर्जी यांच्याकडे बैठक झाली. यावेळी हुडकोचे मुख्य कार्यकारी संचालक रविकांत, मुंबई नगरविकास विभागाचे अधिकारी श्री. गोखले, मनपा आयुक्ता जीवन सोनवणे, सीए अनिल शहा, लेखाधिकारी चंद्रकांत वांद्रे उपस्थित होते. बैठकीत मनपाने हुडकोच्या कर्ज फेडची सविस्तर माहिती देवून रिसटेलमेंटचा प्रस्ताव पुर्नजीवीत करण्याचा प्रस्ताव फेटाळला. हुडकोच्या अधिकार्यांनी मनपास बजावलेली 341 कोटीच्या डिक्री नोटीसेवर बोलावे असे सांगितेल.
राज्यमंत्री सिंह यांच्याशी चर्चा
बैठकीनंतर खासदार ए. टी. पाटील यांनी राज्यमंत्री राव इंद्रजीत सिंह यांची मनपा व मुंबई मंत्रालयातील अधिकार्यांसोबत भेट घेतली. हुडकोच्या कर्जाबाबत मंत्री सिंह यांना माहिती देवून तसेच याबाबत तोडगा काढण्यावरून चर्चा केली. यावर मंत्री सिंह यांनी या प्रकरणात लक्ष देवू असे आश्वासन दिले.
केंद्रीय मंत्री वैकय्या नायडूंना बैठकी नंतर खासदार ए. टी. पाटील तसेच मनपा अधिकारी व मुबईचे अधिकारी हुडको संदर्भात चर्चा करण्यासाठी भेट घेणार होते. परंतू मंत्री नायडू हे दिल्लीत नसल्याने भेट होवू शकली नाही. यावेळी खासदार पाटील यांनी मंत्री नायडू यांना हुडको बाबत बैठक घ्यावी असे पत्र दिले.