हुडकोला मनपाने सादर केला पुनर्गठनचा नवीन प्रस्ताव

0

जळगाव । वित्त विभागाचे मुख्य सचिव डि. के. जैन यांनी मनपाने 2004 चे कर्जपुर्नगठणचा (रिशेड्यूलिंग) प्रस्ताव आज तपासून योग्य असल्याचे सांगितले. त्यानुसार आयुक्त जीवन सोनवणे यांनी हा प्रस्ताव हा 20 जून रोजी मुंबई हुडकोकडे दिला आहे. महापालिकेने हुडकोकडून घेतेले कर्जाचे 2004 नुसार पुनर्गठनचा नविन प्रस्ताव तयार करण्याची सूचना मुंबई येथे बैठकीत झाल्या होत्या. त्यानुसार महापालिकेने पुनर्गठनचा नविन प्रस्ताव तपशिलानुसार तयार केला. यात मनपाकडे 77 कोटी 45 लाख रुपये व्याजासकट हुडकोला देणे बाकी असल्याचे दिसून आले आहे.

दिल्ली येथे 29 जूनला हुडको बैठकीत एकरकमी परतफेडीचा प्रस्ताव
हा प्रस्ताव सोमवारी आयुक्त जीवन सोनवणे हे वित्त विभागाचे मुख्य सचिव जैन यांना देणार होते. परंतु मुख्यमंत्री यांच्यासोबत जैन बैठकीत व्यस्त असल्याने हा प्रस्ताव तपासला गेला नाही. आज मुख्यसचिव जैन यांनी हा प्रस्ताव सविस्तर तपासून हा प्रस्ताव योग्य असल्याचा निर्वाळा दिला. तसेच हा प्रस्ताव हुडकोला देण्यास काहीही हरकत नसल्याचे आयुक्त सोनवणे यांना सांगितले. त्यानुसार हुडको मुंबईला हा प्रस्ताव आयुक्त सोनवणे यांनी आज सादर केला. थकीत रक्कमेच्या पंचवीस टक्के रक्कम दिल्यानंतर उर्वरीत पैसे हप्त्याने भरण्याच्या तयारीत महापालिका प्रशासन आहे. त्यापूर्वी हुडकोला दिला जाणार्‍या प्रस्तावावर 29 जूनला हुडको संचालकांच्या दिल्ली येथे होणार्‍या बैठकीत एकरकमी परतफेडीसंदर्भात काय निर्णय घेतात याकडे आला लक्ष लागून असणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हुडको कर्जाचा हुडोकालेला दिलेला प्रस्ताव हा हुडकोने मंजूर करावा. यासाठी केंद्रीय मंत्री वैकय्या नायडू यांना पत्र देणार असून या प्रस्ताव निर्णय घेवून हा तिढा सोडावा अशी विनंती केली.