हुडको कर्जफेडीसंदर्भात अध्यादेश

0

जळगाव । हुडकोकडून घेतलेल्या कर्जाच्या परतफेडीसंदर्भात शासनाने जारी केलेला अध्यादेश मनपा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. 253 कोटींचा एकमुक्त परतफेडीचा प्रस्ताव मान्य करण्यात आला. महापालिकेस वितरीत करावयाच्या 250 कोटी इतका निधी मनपा पायाभूत सुविधांमधून सध्या वितरीत करण्यात यावा. 3 कोटी रक्कम महापालिकेने वस्तू व सेवाकर भरपाई श्रमदानातून उभारावी. शासनाकडून वितरीत करण्यात येणार्‍या 250 कोटी रकमेमध्ये अंतर्भूत करुन 253 कोटी रक्कम अदा करावी. शासनाकडून वितरीत करण्यात येणार्‍या 250 कोटींपैकी 125 कोटी इतकी रक्कम मनपास देय असलेल्या वस्तू व सेवाकर भरपाई अनुदानातून ऑक्टोबरपासून 3 कोटीप्रमाणे वसुल करण्यात यावी असे अध्यादेशात नमूद केले आहे.