रेल्वे प्रशासनाचा प्रवाशांना मोठा दिलासा ; केवळ 12 गाड्या रद्द
भुसावळ- 28 पॅसेंजरसह 12 एक्स्प्रेस रद्द करण्याचा दोन दिवसांपूर्वी रेल्वे प्रशासनाने घेतलेला निर्णय प्रवाशांच्या वाढत्या दवाबामुळे मागे घेतला असून 32 रेल्वे गाड्या सुरू ठेवण्याचा निर्णय जाहीर केल्याने खान्देशातील रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. भुसावळ-भादली दरम्यान तिसर्या रेल्वे लाईनच्या कामासह नॉन इंटर लॉकिंग, रीमॉडेलिंग आदी कामांसाठी रेल्वे प्रशासनाने 5 ते 20 एप्रिलदरम्यान भुसावळ विभागातून धावणार्या 28 (अप-डाऊन) पॅसेंजर, 12 एक्स्प्रेस रद्द तर चार सुपरफास्ट एक्स्प्रेस शॉर्ट टर्मीनेट करण्याचा निर्णय घेतला होता मात्र उन्हाळी सुट्यांमुळे रेल्वे गाड्यांना असलेला तोबा गर्दी तसेच लग्नाचा हंगाम पाहता रेल्वे प्रवाशांनी या निर्णयाविरुद्ध तीव्र नाराजी व्यक्त केल्यानंतर तसेच रेल्वे संघटनांच्या रेट्यानंतर रद्द केलेल्या 44 पैकी 32 पूर्वनियोजित एक्स्प्रेस गाड्या सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या गाड्यांचा रेल्वे प्रवाशांना दिलासा
काशी एक्स्प्रेस, महाराष्ट्र, अमरावती-मुंबई एक्स्प्रेस, हुतात्मा, बरेली, गुवाहाटी, गोंडवाना, विशाखापट्टणम, पुरी-अमदाबाद, हावडा-अमदाबाद, कामाख्य, लखनऊ-पुणे, ब्रांद्रा-गोरखपूर, ताप्तीगंगा, गांधीधाम, ताप्तीगंगा-गुवाहाटी एक्स्प्रेस या गाड्या अप-डाऊन मार्गावर सुरू राहणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
रेल्वे प्रवााशांच्या नाराजीची प्रशासनाकडून दखल
भुसावळ रेल्वे स्थानकावर नवीन प्लॅटफॉर्म सुरू करण्यासाठी ‘कमिशन ऑफ रेल्वे सेफ्टी’ने हिरवा कंदील दिला असून आवश्यक कामे करणे, भुसावळ-जळगाव दरम्यानच्या तिसर्या लाइनसाठी इंटर लॉकिंग आणि यार्ड रीमॉडेलिंग अशा तीन कारणांमुळे रेल्वे प्रशासनाने 5 ते 20 एप्रिल दरम्यान भुसावळ विभागातून धावणार्या 28 पॅसेंजर, 12 एक्स्प्रेस रद्द तर चार गाड्या शॉर्ट टर्मिनेट केल्याचा निर्णय घेतल्यानंतर खान्देशातील प्रवासी संघटना तसेच रेल्वे प्रवाशांकडून प्रचंड टीकेची झोड उठल्यानंतर रेल्वे प्रशासनाने रद्द केलेल्या 44 पैकी 32 गाड्या नियमितपणे सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे तर आता केवळ पॅसेंजर, 12 साप्ताहिक गाड्या रद्द राहतील.