हुताम्यांना अभिवादन

0

शिरूर । क्रांती दिनानिमित्त बुधवारी लोकजागृती संघटनेच्या वतीने स्वातंत्र्य युद्धातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. तसेच यानिमित्त रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात मोठ्या प्रमाणात रक्तदात्त्यांनी रक्तदान केले.

या शिबिरात पुण्यातील सह्याद्री हॉस्पिटलच्या रक्तपेढीने हे रक्त संकलीत केले. या शिबिराचे हे 26 वे वर्ष असून या कार्यक्रमाचे आयोजन लोकजागृती संघटनेचे अ‍ॅड. ओमप्रकाश सतिजा, रविंद्र धनक, रविंद्र सानप, अनिल बांडे, नगरसेवक मंगेश खांडरे, संजय बारवकर, माजी नगराध्यक्ष राजेंद्र क्षीरसागर आदींनी केले होते.