पिंपरी-चिंचवड : हुल्लडबाजी करत भरधाव जाणार्या एका टोळक्याची भरधाव मोटार मोरवाडी, म्हाडा कॉलनीतून एसएनबीपी महाविद्यालयाकडे जाणार्या रस्त्यालगतच्या झाडाला धडकली. यामध्ये रस्त्यालगत उभ्या असलेल्या काही दुचाकींचे नुकसान झाले. मात्र, मोठी दुर्घटना टळली. या तरूणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल केला आहे.
मोरवाडी, एसएनबीपी हा अत्यंत वर्दळीचा रस्ता आहे. मोटारीत महाविद्यालयीन तरूण होते. पावणेबाराच्या सुमारास झालेल्या या अपघाताने रस्त्यावरील वाहतूक खोळंबली. मोटारीत मागील बाजुस ठेवलेली लाकडी दांडकी सापडली आहेत.