हुवेचे मीडियापॅड मालिकेतील दोन टॅबलेट जागातिक बाजारात येण्याची घोषणा

0

मुंबई। मीडियापॅड मालिकेत आता दोन नवीन टॅबलेटची भर पडली आहे. यातील मीडियापॅड एम3 लाईट हे मॉडेल वाय-फाय आणि वाय-फाय+एलटीई अशा दोन व्हेरियंटमध्ये तर टी 3 हे मॉडेल 7, 8 आणि 10 इंची डिस्प्लेंच्या तीन व्हेरियंटमध्ये ग्राहकांना उपलब्ध करण्यात आले आहे. यातील मीडियापॅड एम 3 या मॉडेलमध्ये दहा इंची आकाराचा आणि 1920 बाय 1200 पिक्सल्स म्हणजेच फुल एचडी क्षमतेचा डिस्प्ले प्रदान करण्यात आला आहे. क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 625 प्रोसेसरने सज्ज असणार्या या मॉडेलची रॅम तीन जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज 32 जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने वाढविण्याची सुविधा प्रदान करण्यात आली आहे. यात 6600 मिलीअँपिअर प्रति-तास इतक्या क्षमतेची बॅटरी दिलेले असून हे मॉडेल अँड्रॉइडच्या नोगट या आवृत्तीवर चालणारे असेल. या टॅबलेटसोबत अतिशय उत्तम दर्जाचे चार स्पीकर देण्यात आले आहेत. संगीतप्रेमींसाठी हे विशेष आकर्षण असेल.

आठ इंची, 280 बाय 800 पिक्सल्स क्षमतेचा डिस्प्ले
मीडियापॅड टी 8 या मॉडेलमध्ये आठ इंची आणि 1280 बाय 800 पिक्सल्स क्षमतेचा डिस्प्ले असेल. यातही दोन जीबी रॅम 16 जीबी स्टोअरेज तसेच तीन जीबी रॅम 32 जीबी स्टोअरेज असे दोन व्हेरियंट असतील. दोन्हीत मायक्रो-एसडीच्या मदतीने स्टोअरेज वाढविण्याची व्यवस्था असेल. यातील कॅमेरे 5 व 2 मेगापिक्सल्स क्षमतांचे व बॅटरी 4800 मिलीअँपिअर प्रति-तास या क्षमतेची असेल. हे मॉडेल अँड्रॉइडच्या नोगट आवृत्तीवर चालणारे असून यावर कंपनीचा इएमयुआय 5.1 हा युजर इंटरफेस देण्यात आला आहे. हे मॉडेल वायफाय ओन्ली तसेच वाय-फाय+फोर-जी एलटीई नेटवर्क या दोन पर्यायांमध्ये ग्राहकांना सादर करण्यात येणार आहे. तर दहा इंची मॉडेलमध्ये याच आकारमानाचा एचडी स्क्रीनसह दोन जीबी रॅम व 16 जीबी स्टोअरेज देण्यात आलेले आहे. हुवे कंपनीच्या मीडियापॅड मालिकेतील हे टॅबलेट पहिल्यांदा पोलंड देशात उपलब्ध करण्यात आले आहेत. मात्र लवकरच ते भारतासह अन्य राष्ट्रांमधील ग्राहकांना खरेदी करता येईल अशी शक्यता आहे.

सात इंची मॉडेल, 1024 बाय 600 पिक्सल्सचा डिस्प्ले
मीडियापॅड टी 3 च्या सात इंची मॉडेलमध्ये याच आकारमानाचा आणि 1024 बाय 600 पिक्सल्सचा डिस्प्ले असेल. 64 बीट मीडियाटेक एमटी8127 या प्रोसेसरने सज्ज असणार्या या मॉडेलचे एक जीबी रॅम व आठ जीबी स्टोअरेज तसेच दोन जीबी रॅम व 16 जीबी स्टोअरेज असे दोन व्हेरियंट ग्राहकांना खरेदी करता येतील. या दोन्ही व्हेरियंटमध्ये मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने 64 जीबीपर्यंत स्टोअरेज वाढविण्याची सुविधा असेल. हे मॉडेल अँड्रॉइडच्या मार्शमॅलो या आवृत्तीवर चालणारे असून यावर कंपनीचा इएमयुआर 4.1 हा युजर इंटरफेस असेल. यातील बॅटरी 3100 मिलीअँपिअर प्रति-तास तर दोन्ही कॅमेरे दोन मेगापिक्सल्स क्षमतेचे असतील.