हुश्श्श….आज पेट्रोल दरवाढ नाही

0

मुंबई-गेल्या काही दिवसांपासून रोज होणाऱ्या इंधन दरवाढीला आज काहीसा ब्रेक लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत दररोज वाढ होत आहे. पेट्रोलने नव्वदी पार केली असल्याने सर्वसामान्यांमध्ये नाराजी आहे. इंधन दरवाढीमुळे पेट्रोल लवकरच शंभरी गाठेल अशी भीती व्यक्त होत आहे. सोमवारी पेट्रोलने नव्वदी पार केल्यानंतर मंगळवारी पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली होती. सोमवारी पेट्रोल 11 पैशांनी, तर डिझेल 5 पैशांनी महागलं होतं. तर मंगळवारी पेट्रोल 14 पैसे तर डिझेल 10 पैशांनी महागले.

मंगळवारी झालेल्या इंधन दरवाढीसोबत मुंबईत पेट्रोलचा दर 90.22 रुपये प्रति लिटर झाला असून डिझेलचा दर 78.69 रुपये प्रति लिटर झाला आहे. दिल्लीत पेट्रोलचा दर 82.86 रुपये प्रति लिटर झाला आहे. तर डिझेलचा दर 74.12 रुपये प्रति लिटरवर पोहोचला आहे.