जळगाव: अमळनेर येथील मृत्यू झालेल्या कोरोना बाधित महिलेच्या संपर्कातील कुटुंबिय पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने याच महिलेच्या संपर्कातील ईतर व्यक्तींच्या अहवालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते . त्यापैकी शनिवारी पाच जणांचे अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डाॅ भास्कर खैरे यांनी दिली आहे.
येथील कोविड रूग्णालयात गेल्या तीन दिवसापूर्वी कोरोना संशयित म्हणून स्वॅब घेतलेल्या व्यक्ती पैकी 32 व्यक्तींचे तपासणी अहवाल प्राप्त झाले असून सर्वांचे तपासणी अहवाल *निगेटिव्ह* आले आहेत.
यामध्ये अमळनेर येथील मृत्यू झालेल्या कोरोना बाधित महिलेच्या संपर्कातील पाच व्यक्तींचा समावेश आहे. अशी माहिती डाॅ भास्कर खैरे यांनी दिली आहे.