मुंबई: हृतिक रोशनने दिशा पटानीसोबत फ्लर्ट करण्याचा प्रयत्न केला म्हणून वैतागून दिशाने चित्रपट सोडल्याची चर्चा गेल्या काही दिवसांमध्ये रंगल्या होत्या. या संपूर्ण प्रकरणावर दिशा पाटनीचा बॉयफ्रेंड टायगर श्रॉफने मौन सोडलं आहे. मुंबईतील एका कार्यक्रमात टायगरला दिशा व हृतिकबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता.
‘चर्चा आणि अफवा हे या इंडस्ट्रीत पसरतच असतात. हे फक्त हृतिक किंवा दिशाबद्दल घडतंय असं नाही. प्रत्येक कलाकाराला अशाप्रकारच्या घटनांमधून जावं लागतं,’ असं उत्तर टायगरने दिलं. ‘अत्यंत बालिश मानसिकतेतून पसरवलेल्या त्या अफव्या होत्या. मी हृतिक आणि दिशाला चांगल्याप्रकारे ओळखतो. अशी कोणतीही गोष्ट घडली नव्हती,’ असं टायगर म्हणाला.