टोरोंटो – हृदय रोगांवर उपाय म्हणून वैज्ञानिकांनी पोस्टाच्या तिकिटाच्या आकाराचे अँजिओ चीप नावाचे बँडेज विकसित केले आहे. हे पेशीसमुहांपासून बनवलेले असून हृदयाला झालेली हानी भरून काढण्याला उपयुक्त आहे. विशेष म्हणजे ह्या पेशीसमुहाला (टीश्यू) हृदयात इंजेक्शनद्वारा सोडता येते.
बऱ्याचदा हृदयविकाराच्या झटक्याने किंवा अन्य वैद्यकीय उपायांमुळेही हृदयाच्या पेशी किंवा पेशीसमुहांना हानी पोहोचते. अशा वेळी छातीचे ऑपरेशन करून हृदयापर्यंत पोहोचावे लागते. कॅनडामधील संशोधकांनी हे श्रम वाचवले आहेत. छातीच्या पोकळीत बंदीस्त असलेल्या हृदयाच्या पृष्ठभागावर इंजेक्शन द्वारे टीश्यू सोडता येतात, हे संशोधकांनी दाखवून दिले आहे. अँजिओ चीप असे या टीश्युला म्हणतात. हे अस्तर हृदयाच्या हानी झालेल्या जागेवर लावल्यानंतर ते इतर पेशींप्रमाणे हृदयाच्या पृष्ठभागात जैविकदृष्ट्या मिसळून जाते. प्रयोगांनी सिद्ध केले आहे की रक्ताभिसरण संस्थेने आणि हृदयाने अँजिओ चीप्सशी जुळवून घेतले आहे.