भावाच्या मुलाच्या लग्नास जात असतांना झाली घटना
जळगाव । पुतण्याच्या लग्नासाठी येण्यासाठी वेटनेरकडून जळगावला लग्नाच्या वराडीच्या गाडीत जात असतांना सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास त्यांना हृदयविकाराच्या झटक्या आल्याने त्यांना तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यासाठी येत असतांना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला असून वैदयकिय अधिकारी यांनी त्यांना मृत घोषीत केले. मिळालेल्या माहितीनुसार, आप्पा हरी वराडे (वय-45) रा. विटनेर हे आपल्या भाऊ रमेश हरी वराडे यांचा मुलगा सोपान वराडे यांच्या लग्नासाठी जळगाव येथील मराठा सामुहिक विवाह सोहळ्यात सहभाग नोंदवला होता. शहरातील सागर पार्कवार आयोजित सामुहिक विवाह सोहळ्यातील लग्नासाठी सकाळी विटनेरहून वर्हाडीचे दोन गाड्या निघाल्या. त्यानंतर शेवटच्या गाडीत सर्व मंडळीसोबत आप्पा हरी वराडे हे देखील बसले. शिरसोली रोडवरील जैन इरिगेशनजवळील देवकर अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळ आप्पा वराडे यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांच्या हृदयाचे ठोके वाढल्याने सोबत असलेल्या गावकर्यांनी त्यांना तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यासाठी रवाना करण्यात आले. जिल्हा रूग्णालयातील वैद्यकिय अधिकारी यांनी त्यांना मृत घोषीत केले. मयत अप्पा वराडे यांना दोन भाऊ, चार मुली, लहान मुलगा, पत्नी असा परीवार आहे. लग्नाच्या दिवशी परीवारातील सदस्यांची अचानक मृत्यू झाल्याने लग्नकार्यात आलेल्या पाहुणे मंडळींकडून हळहळ व्यक्त होत होती.