जळगाव – शिवाजी नगरात राहणाऱ्या दिपक देवीदास कदम (वय-44) आज सकाळी 9.30 वाजेच्या सुमारास हृदयविकाराच्या तिव्र झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली असून याबाबत जिल्हा पेठ पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिपक देवीदास कदम हे ठेकेदार म्हणून काम करत होते. दिपक कदम यांच्या छातीत जळजळ आणि ॲसिडीटीचा त्रास गेल्या आठवड्यापासून जाणवू लागला होता. छातीत किरकोळ दुखाप होत आहे असू समजून त्यांनी दुर्लक्ष केले. आज सकाळी 9.30 ते 10 वाजेच्या सुमारास त्यांना राहत्या घरी हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ते भाजपाचे युवा मोर्चाचे माजी सरचिटणीस आणि माजी अध्यक्ष होते. सध्या ते भाजप पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते होते. ते उमविचे कर्मचारी पुरूषोत्त कदम यांचे बंधू होत. त्यांच्या पश्चात एक भाऊ आणि वाहिनी असा परीवार आहे. आज सायंकाळी नेरी नाक्या स्मशानभूमीत मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.