हृदयविकाराच्या झटक्याने एकाचा मृत्यू

0

जळगाव – जेवन करण्यासाठी बसत असतांना अचानकपणे 35 वर्षीय प्रौढाच्या छातीत दुखून आल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील कानळदा येथे घडली असून याबाबत तालुकापोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, गणेश भास्कर कोळी (वय-35) रा. कानळदा ता.जि.जळगाव हे मोलमजूरी करून आपला उदनिर्वाह करीत असतात. दुपारी 1.30 वाजेच्या सुमारास जेवन करण्यासाठी बसत असतांना अचानकपणे छातीत दुखू लागले. त्यांना अत्यवस्थ वाटत असल्याचे तातडीने जिल्हा वैदयकिय महाविद्यालया हलविण्यात आले. मात्र, दुपारी 3 वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेबाबत तालुका पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत गणेश कोळी यांच्या पश्चात वडील, पत्नी व दोन मुले असा परीवार आहे.