जळगाव । योगेश्वर नगरात हृदयविकाराच्या झटक्याने प्रौढाचा मृत्यू झाला असून याबाबत शनिपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पद्माकर दौलत पाटील (वय-52) असे मयताचे नाव आहे. योगेश्वर नगर येथील रहिवासी पद्माकर पाटील यांना सकाळी 9.30 ते 10 वाजेदरम्यानात हृद्ययविकारचा झटका आला. हे कुटूंबियांचे लक्षात येताच त्यांनी जिल्हा सामान्य रूग्णालयात पाटील यांना दाखल केले परंतू जिल्हा रूग्णालयातील डॉ. सुशांत सुपे यांनी त्यांची तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले. याबाबत डॉ. सुपे यांनी दिलेल्या खबरीवरून शनिपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणीचा तपास पोहेकॉ. रविंद्र पाटील हे करीत आहेत. दरम्यान, पद्माकर पाटील हे आमदार राजुमामा भोळे यांचे नातेवाईक आहेत.