हृदय म्हटल की बदाम हे सर्वांनाच माहित आहे. बदाम हृदयभंग करीत नाही. उलट सर्वांना प्रिय असणारा सुका मेवा बदाम हा कोलेस्टोरॉलची वाढलेली मात्रा कमी करण्यास मदत करतो, असे पेनसिल्व्हानिया विद्यापीठातील वैज्ञानिकांनी सिद्ध करून दाखवले आहे. मुठभर बदाम रोज खाल्ले तर एचडीएल किंवा चांगल्या कोलेस्टोरॉलमध्ये वाढ होते त्यामुळे हृदयाचे आरोग्य उत्तम रहाते. न्यूट्रीशन जर्नलमध्ये बदामाची उपयुक्तता वर्णन करण्यात आलेली आहे.
वैज्ञानिकांनी जवळपास सहा आठवडे दोन गटांचा अभ्यास केला. एकास बदाम तर दुसऱ्याला केळ्याचे मफिन खायला दिले. त्यांचे कोलेस्टोरॉल तपासले असता बदामांचा फायदा स्पष्टपणे दिसून आला. एचडीएल रक्तात सोडले जाते तेव्हा त्याचे प्रमाण कमी असते. त्याचे कण पेशींमध्ये असलेले कोलेस्टोरॉल वेचित वेचित पुढे लिव्हरमध्ये नेतात. तेथे कोलेस्टोरॉल तोडले जाते. लिव्हरकडे धोकादायक कोलेस्टोरॉल नेऊन त्याचा धोका नष्ट करण्यासाठी बदामाचे सेवन अत्यंत गुणकारी आहे, असे डॉ. क्रीस एथेरटॉन यांनी सांगितले.