पुणे । पुणे-मुंबई महामार्गावर सीएमई-हॅरिस पुलाजवळ मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू असताना एमएनजीएल वायू वाहिनीची झालेली गळती तात्काळ नियंत्रणात आल्याने मोठा अनर्थ टाळला. आता आजूबाजूच्या रहिवाशांना कोणताही धोका नसल्याचे स्पष्टीकरण महामेट्रोने दिले आहे.
सीएमई-हॅरिस पुलाजवळ मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू आहे. मंगळवारी सकाळी 10 च्या सुमारास ड्रीलिंगचे काम करीत असताना येथे वायू गळती होऊ लागली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन मेट्रो प्रकल्प अधिकारी, वाहतूक पोलिस, अग्निशमन दलाचे जवान आणि एमएनजीएल गॅस वाहिनीचे कर्मचार्यांनी त्वरित वायू गळती नियंत्रणात आणली. या मार्गावरील वाहतूक सेवा रस्त्यावर वळविण्यात आली होती.