कराची । आयसीसी चॅम्पियन्स करंडक वन डे क्रिकेट स्पर्धेसाठी पाक संघात उमर अकमलला डच्चू देण्यात आला आहे. या स्पर्धेसाठी उमर अकमलला इंग्लंडमधून मायदेशी येण्यासाठी पीसीबीने सांगितले होते. तंदुरूस्ती चांचणीत अकमल फिट नसल्याने त्याला स्पर्धेसाठी पाक संघातून वगळल्याची माहिती निवड समिती सदस्य इंझमाम उल हकने सांगितले. आगामी चॅम्पियन्स करंडक स्पर्धेसाठी अकमलऐवजी हॅरिस सोहलला संघात स्थान देण्यात आले आहे. यापूर्वी दोनवेळा उमर अकमल तंदुरूस्ती चाचणीत उत्तीर्ण झाला नव्हता.