हेंद्रापाडा ग्रामपंचायतमध्ये भ्रष्टाचाराचा हैदोस

0

शिरपूर । शिरपूर तालुक्यातील ग्रामपंचायत हेंद्रापाडा येथे विविध योजेने अंतर्गत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला असुन अनेक शासकीय योजनांच्या माध्यमाने ग्रामपंचायत सरपंच ग्रामसेवक व सहकार्‍यांनी भ्रष्टाचाराचा कळस केला असुन त्याची सखोल चौकशी करुन कार्यवाही करण्याची विनंती एका निवेदनाव्दारे पंचायत समिती सदस्य साहबाई भोंगा पावरा, ग्रामपंचायत सदस्य पार्वती प्रदिप पावरा व नागरीकांनी केली आहे.सदरचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी धुळे यांना व गट विकास अधिकारी शिरपूर यांना देण्यात आले आहे.

सदर निवेदनात ग्रामपंचायत कारभारा बाबत गंभिर आरोप लावण्यात आलेले असुन यात असा आरोप करण्यात आला आहे की सरपंच ह्या अशिक्षीत असल्यामुळे उप सरपंच व ग्रामरोगार सेवक व ग्रामसेवक यांनी संगणमताने गैरकारभार केला आहे.उप सरपंच हेच ग्रामरोजगार सेवकाचे काम करत असुन त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा न देता रोजगार सेवकाचे काम कामकाज करीत आहेत. सरपंच व उप सरपंच अशिक्षीत असल्यामुळे सरपंचांची मुले मस्टर भरत असुन बनावट सह्या करुन कामकाज सुरु असल्याचे म्हटले आहे. तसेच गावातील वृक्ष लागवड,ओघळ नियंत्रण याा कामात देखिल भ्रष्ट ्राचार झाला असुन कोणतीही वृक्ष लागवड न करता अनुदान लाटण्याचा आरोप करण्यात आला आहे.

खोट्या सह्या करुन अपहार
शिवाय अघोळ नियंत्रणच्या कामात नातेवाईकांची नावे समाविष्ट करुन रककम हडप करण्याचे देखिल आरोप करण्यात आले आहेत. पेसा कायद्याअंतर्गत मिळालेल्या निधीचा सुध्दा गैरवापर करुन अध्यक्ष व सदस्य यांच्या सह्या आवश्यक असतांना त्यांना डावलुन ही र क्कम काढून खर्च करण्यात आली आहे. या खात्यात डिसेंबर अखेर 2,70,000 इतकी रकक म आली होती व चालु वर्षात 3,50,000 रुपये आले आहेत. मात्र या रकमेचा वापर करतांना खोट्या सह्या करुन अपहार झाल्याचा आरोप केला आहे. शिवाय स्वच्छ भारत अभियान अंतर्गत देखिल ग्रामसेवकांच्या नातेवाईकाला कामाचा ठेका देऊन अपहार करण्याचा आरोप लावला आहे.