हेडगेवार भारत मातेचे सुपुत्र -प्रणव मुखर्जी

0

नागपूर-माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी नागपुरातील रेशीम बाग या ठिकाणी असलेल्या स्मृती मंदिराला भेट दिली. या ठिकाणी सरसंघचालक मोहन भागवत यांनी त्यांचे स्वागत केले. हेडगेवार हे भारतमातेचे सुपुत्र आहेत आहेत अशी प्रशंसा प्रणव मुखर्जी यांनी केली आहे. स्मृती मंदिर या ठिकाणी असलेल्या नोंदवहीत त्यांनी ही नोंद केली. आता प्रणवदा आपल्या भाषणात नेमकी काय भूमिका मांडणार हे पाहणे महत्त्वाचे आहे. त्यांच्या भाषणाकडे सगळ्या देशाचे लक्ष लागून राहिले आहे.