हेमंत भंडारी दुहेरी मुकुटाचा मानकरी

0

ठाणे। ठाणे जिल्हा पॉवरलिफ्टिंग असोसिएशनच्या विद्यमाने नगरातील ब्राह्मण विद्यालय सभागृहात ठाणे जिल्हास्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धांचे आयोजन करण्यांत आले. या स्पर्धेत ऐरोली येथील जे.वि.एम.महाविद्यालयाचा 66 कि.वजनी गटातील स्पर्धक हेमंत बहादूर भंडारी याची ठाणे नवोदित व ठाणे बेंचप्रेस अशा दोन्ही गटात स्ट्राँग मॅन म्हणून निवड करण्यांत आली.

नवोदित स्पर्धेत त्याने 410 कि. तर बेंचप्रेस स्पर्धेत 110 कि. वजन उचलले.स्पर्धेत विविध 7 गटांतून 80 स्पर्धक सहभागी झाले. नवोदित गटात 43 गुणांसह ऑर्डनन्स फॅक्टरी, अंबरनाथ तर बेंचप्रेस्स गटात 50 गुणांसह वर्तकनगर स्पोर्ट्स क्लबने सांघिक अजिंक्यपद पटकावले. ठाणे जिल्हा पॉवरलिफ्टिंग असोसिएशनचे अध्यक्ष संभाजी सूर्यराव, उपाध्यक्ष देवदत्त भोईर, रवी चव्हाण, कार्यवाह मधुकर पाटकर, आंतर राष्ट्रीय पॉवरलिफ्टर रामदास खरात, राष्ट्रीय महिला पॉवरलिफ्टर लक्श्मी ठाणेकर, माजी उपाध्यक्ष प्रल्हाद नाखवा आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला.