हेरीटेज मॅरेथॉन स्पर्धेत रनर्स ग्रुपचा सहभाग

0

जळगाव । ऐतिहासिक दौलताबाद किल्ला-वेरूळ लेणी मार्गावरील मराठवाडा भागातील सर्वात मोठ्या एम.आय.टी औरंगाबाद मॅरेथॉन मध्ये जळगाव रनर्स ग्रुप ने यशस्वी सहभाग नोंदवला. या धावपटूंनी 10,21,25 किमीचीअल्ट्रा हॉफ मॅरेथॉन पूर्ण केली. दरम्यान, भव्य खान्देश रन जळगाव रनर्स ग्रुप 10 डिसेंबरला जळगाव सागर पार्क येथे आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत पुणे,मुंबई येथील खेडाळूनी निर्विवाद वर्चस्व मिळवले.

यांचा होता सहभाग
यात किरण बच्छाव, डॉ.तुषार कोठावदे,सचिन महाजन, गीतेश मुंदडा,अभय पाटील, मोईझ लेहरी,डॉ.प्रशांत देशमुख, डॉ.मिलिंद जोशी, डॉ.अजय शास्त्री, डॉ.नितीन पाटील, विवेक बागरी, सचिन मंडोरा,संतोष सिंग, डॉ.राहुल महाजन, डॉ.सोनाली महाजन, अंकिता अमर कुकरेजा, वेदांती किरण बच्छाव, उमेश महाजन, अजित महाजन, वैभव लिंबडा,आशिष पाटील, प्रा.शशांक झोपे, हरगोविंद मणियार, राकेश गावंडे, सरपंच अनिल खडके आदींचा सहभाग होता.