आजवर आपण अनेक प्रकारच्या लग्झुरियस ट्रक होम व्हॅन पाहिल्या असतीलच. पण तुम्ही कधी या ट्रक होमसोबत फ्री हेलिकॉप्टर पाहिले आहे का? एलिजियम नावाची आतापर्यंतची सर्वात आलिशान व्हॅन लग्झुरी उत्पादन बनवणार्या अमेरिकेतील फ्यूरियॉन कंपनीने बनवली आहे. ज्यात चक्क हेलिकॉप्टरची सुविधा देण्यात आली आहे. पेंटाहाऊससारख्या सुविधा या व्हॅनमध्ये आहेत. यात किचन, लांऊज, इंडक्शन कुकटॉप, मायक्रोव्हेव, फ्रीज, डिशवॉशर, ओव्हन, वाइन फ्रीज इत्यादि सुविधा देण्यात आल्या आहेत.
1. 2017च्या कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स शोमध्ये या व्हॅनला दाखवले जाणार आहे. 2 सीटर रॉबिन्सन हेलिकॉप्टर व्हॅनच्या छतावर हेलिपॅड बनवले आहे.
2. यावर 2 सीटर रॉबिन्सन आर-22 हेलिकॉप्टर तैनात आहे. जेथे गर्दीची वेळ आहे तेथून थेट हेलिकॉप्टरवरून जाता येईल.
3. 75 इंचाच्या 3 हाय डेफिशन टीव्ही, मल्टिपल इन्फोटेन्मेंट सिस्टिम, फायरप्लेस, मास्टर बेडरूम इत्यादि सुविधा आहेत, सोना बाथ, हॉट टब, छतावर लाऊंजवर मरीन ग्रेड ऑडियो सिस्टिमही आहेत.
4. या बसची लांबी 45 फूट रुंदी 8 फूट आणि उंची 14 फूट आहे. या व्हॅनची किंमत तब्बल 17 कोटी इतकी आहे.