हेलिकॉप्टर दरवाजा तुटल्याने दोन नौसैनिक ठार

0

केरळ- कोची नेव्हल बेसमध्ये हेलिकॉप्टर हँगरचा दरवाजा तुटून झालेल्या अपघातात दोन नौसैनिक ठार झाले आहे. तीन जण जखमी आहेत. ही घटना आज सकाळी ११ वाजता कोची नेव्हल बेसमध्ये घडली आहे.

हेलिकॉप्टर हँगरचा दरवाजा या दोन्ही नौसैनिकांच्या अंगावर कोसळला आणि अपघातात त्या नौसैनिकांचा मत्यू झाला. या अपघातात आणखी दोन ते तीन नौसैनिक जखमी झाले असून, या अपघाताच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.