सांगली । जिल्ह्यात गतवर्षी एक-दोन नव्हे तब्बल 444 जणांचा अपघाती मृत्यू झाला. त्यापैकी 165 जणांनी हेल्मेट न घातल्यामुळे डोक्यास मार लागून मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती पोलिस तपासात स्पष्ट झाली आहे. हेल्मेट घातले असते, तर संबंधितांचा जीव वाचला असता.