जळगाव : राष्ट्रीय महामार्गावर हेल्मेट न वापरणाऱ्या दुचाकी स्वारांविरोधात कारवाईची मोहिम सुरु आहे. गुरुवारी आयटीआय जवळ एका शिक्षकाने हेल्मेट नसल्याने महामार्गावर झोपत दंडमाफिसाठी ‘शाळा’ भरविण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलीसांनी हा प्रयत्न हाणुन पाडत शिक्षकाला दंड भरण्यास भाग पाडले.
शहरात आयटीआय जवळ गुरुवारी सकाळी ११.३० वा. वाहतुक शाखेचे कर्मचाऱ्यांना हायवेवरुन एक शिक्षक पत्नीसह दुचाकीवरून विना हेल्मेट जात असल्याचे दिसले. महिला पोलिसांनी त्यांना रोखून हेल्मेटचा का वापर करत नाही,असे सांगत दंड भरण्यास सांगितले. या प्रकाराने शिक्षकाने महिला पोलिसांना कारवाई आमच्यावरच करतात का? असा संताप करत भरत पावती फाडणार नाही,असे सांगितले व महामार्गावर झोपला. वाद विकोपोला गेल्याने अखेर महिला पोलिसांनी शिक्षकासह पत्नीस रामानंदनगर पोलीस स्टेशनला आणले.या ठिकाणी अन्य पोलिसांनी शिक्षकाची समजूत घातली. दंड भरल्यानंतर या दंडमाफिसाठी सुरु असलेल्या शिक्षकाच्या नाट्यावर पडदा पडला.