भुसावळ शहर वाहतूक शाखेचा उपक्रम ; पथनाट्याचे सादरीकरण
भुसावळ- वाहतूक नियमांबाबत जनजागृती होण्यासाठी व हेल्मेटचे महत्त्व नागरीकांना कळण्यासाठी शहर वाहतूक शाखा व संस्कृती फाउंडेशनतर्फे रविवारी शहरातून भव्य हेल्मेट जनजागृती रॅली काढण्यात आली. याप्रसंगी रॅलीतील सहभागी दुचाकीस्वारांनी पोस्टरद्वारे प्रबोधनही केले. पु.ओ.नाहाटा महाविद्यालयापासून रॅलीला प्रारंभ झाला. सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी रॅलीला हिरवी झेंडी दाखवली.
पथनाट्यातूनही प्रबोधन
रॅलीच्या शुभारंभप्रसंगी भुसावळ शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक गंधाले, बाजारपेठ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार, संस्कृती फाउंडेशनचे अध्यक्ष रणजितसिंग राजपूत आदींची उपस्थिती होती. नाहाटा महाविद्यालपासून सुरू झालेल्यी रॅलीचा अष्टभूजा चौक, बाजारपेठ पोलीस स्टेशनमार्गे यावल रोडवरील महात्मा गांधी चौकात आल्यानंतर समारोप झाला. तत्पूर्वी अष्टभुजा चौक व बाजारपेठ पोलीस ठाण्याजवळ वाहतुकीचे नियम समजावून देण्यासाठी पथनाट्य सादर करण्यात आले.
यांनी घेतले परीश्रम
हेल्मेट रॅली यशस्वी होण्यासाठी संस्कृती फाउंडेशनचे स्वयंसेवक तुषार गोसावी, शुभम पाटील, सिद्धांत सराफ, शुभम तायडे, अश्फाक तडवी, नम्रता चांडक, दर्शन पाटील, रुपाली चौधरी, पवन कोळी, मनोहर झांबरे, काजल तायडे, संस्कार मालविया, गायत्री चौधरी, कोमल बोरणारे, गायत्री चौधरी, आकाश धनगर, अजय पाटील, आकाश पाटील, सीमा अढळकर इत्यादींनी परीश्रम घेतले. दरम्यान, रॅलीत सहभागी असणार्यांना सहाय्यक निरीक्षक दीपक गंधाले यांच्याहस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.