पुणे : दुचाकीस्वारांना हेल्मेटसक्ती करू नये असे स्पष्ट मत खा.अनिल शिरोळे यांनी आज(मंगळवार) व्यक्त केले. सत्ताधारी पक्षाच्या जबाबदार लोकप्रतिनिधीने मत व्यक्त केल्यावर सक्ती आणि दंडात्मक कारवाई पोलीस थांबवतील का ? याकडे पुणेकरांचे लक्ष आहे
हे देखील वाचा
दुचाकीस्वारांसाठी पुणे पोलीसांनी हेल्मेटसक्ती केली असून ते नसेल तर दंड आकारणीलाही सुरुवात केली आहे. याबाबत सत्ताधारी भाजपमधून खा.शिरोळे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ट्विटरद्वारे दिलेल्या प्रतिक्रियेत शिरोळे म्हणतात की हेल्मेट वापर ऐच्छिक असावा त्याची सक्ती करू नये असे माझे प्रांजळ मत आहे. रस्त्यातील खड्ड्यांमुळे मानेचे, कंबरेचे आजार होण्याचे प्रकार घडत असतात. त्यात हेल्मेटचा भार डोक्यावर असेल तर त्या वजनाने त्रासाचे गांभीर्य वाढते. शिवाय हेल्मेट घातल्याने वाहनचालकाला आसपासचे आवाज ऐकू येत नाहीत, आसपासचे दिसत नाही त्यामुळे अपघातांची शक्यता वाढते. त्यामुळे त्याबाबत सक्ती नसावी, प्रबोधन केले जावे.