हेल्मेट सक्तीला हमारी अपनी पार्टीचा विरोध 

0
पुणे : नव्या वर्षाच्या सुरुवातीला दुचाकी वाहनचालकांसाठी हेल्मेट सक्ती लागू करण्याचे पोलीस खात्याने ठरविले आहे. या सक्तीला हमारी अपनी पार्टीचा विरोध असून पालकमंत्री यांंनी सक्ती मागे घेण्याचे आदेश द्यावेत अशी पार्टीची मागणी आहे. दुचाकी वाहनचालकांनी हेल्मेट स्वेच्छेने वापरावे, त्यासाठी सक्ती नसावी ही आमच्या पार्टीची भूमिका आहे.
अपुरे रस्ते, वाहतूक कोंडी यामुळे पुण्यात हेल्मेट सक्ती अव्यवहार्य आहे असे मत विविध स्वयंसेवी संस्था, तज्ञांनी आणि सत्ताधारी भाजपच्या आमदारांनीही मांडले आहे. दुचाकीस्वार वयस्कर व्यक्ती, मानेचा विकार  असणाऱ्या  व्यक्ती यांना वैद्यकीय कारणांसाठी हेल्मेट वापरणे अशक्य आहे असे डॉक्टर्सनीही निदर्शनास आणून दिले आहे. पुणेकरांचा विरोध डावलून हट्टापायी सक्ती राबविली गेल्यास हेल्मेट विरोधी आंदोलनात हमारी अपनी पार्टी सहभागी होईल असा इशाराही  पार्टीने दिला आहे. या बाबतचे निवेदन पार्टीचे शहर अध्यक्ष सुधीर जगताप यांनी पालकमंत्री यांना दिले.