पुणे-शहर पोलिसांनी आजपासून हेल्मेट सक्तीची केली आहे. हेल्मेट वापराच्या नियमाची प्रभावीपणे अंमलबजावणी सुरू केल्यावर त्याला विरोध होत आहे. शहरातील हेल्मेटसक्ती विरोधी कृती समितीने घेतलेल्या बैठकीत सविनय कायदेभंग करत मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला.
या बैठकीला माजी महापौर अंकुश काकडे, मोहनसिंग राजपाल, शांतीलाल सुरतवाला,संदीप खर्डेकर, विवेक वेलणकर, मंदार जोशी, धनंजय जाधव आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते. यावेळी घेण्यात आलेल्या निर्णयाप्रमाणे येत्या गुरूवारी (3 जानेवारी) पत्रकार भवन, नवी पेठ येथून दुचाकीवरून हेल्मेट न घालता पोलीस आयुक्त कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चानंतर पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात येणार आहे. या मोर्चात जास्तीत जास्त सहभागी होण्याचे आवाहन पुणेकरांना करण्यात आले.