मनसेचा पोलीस खात्याला सवाल
पुणे : राज्य सरकारचे कोणतेही आदेश नसताना राज्यात फक्त पुणेकरांनाच हेल्मेट सक्तीबाबत वेठीस का धरता? असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुण्याच्या पोलीस उपायुक्ताना केला आहे.
हेल्मेट सक्ती आणि दंडवसुली पोलीसांनी ताबडतोब थांबवावी आणि हेल्मेट वापरासाठी प्रबोधन करण्याच्या सूचना द्याव्यात अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वाहतूक सेनेचे गणेश नायकवाडे, विक्रांत अमराळे यांनी वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त यांना पत्र पाठवून केली आहे.
केंद्रीय मोटार वाहन कायदा 1988चा यानुसार कारवाई केली जात आहे. पण, राज्य मोटार वाहन कायदा 1989 सांगतो की पालिका क्षेत्रामध्ये सर्व मोटारसायकली चालविणार्या किंवा त्यावर बसलेल्या व्यक्तिंना हेल्मेट बंधन कारक नाही. सध्या तर राज्य सरकारचेही आदेश काही नाहीत तरी सक्ती का केली जाते ? असा प्रश्न मनसेने विचारला आहे.