राष्ट्रीय ऐरोबिक जिम्नास्टिक स्पर्धेमध्ये
पिंपरी : दिल्ली येथे सुरु असलेल्या पहिल्या राष्ट्रीय ऐरोबिक जिम्नास्टिक निमंत्रित स्पर्धेत पिंपरी-चिंचवड शहरातील हेवन स्पोर्टस क्लबची खेळाडू वृंदा सुतार हिने सुवर्णपदक पटकावले आहे. या स्पर्धेसाठी हेवन स्पोर्टस क्लबच्या चार खेळाडूंनी सहभाग घेतला होता. हेवन स्पोर्टस क्लबचे प्रमुख प्रशिक्षक व राष्ट्रीय पंच हर्षद कुलकर्णी यांनी ही माहिती दिली.
या स्पर्धेमध्ये 11 वर्षांखालील स्वतंत्र महिला विभागातून निधी असबे व वृंदा सुतार यांनी तर स्वतंत्र पुरूष विभागात अद्वैत खंबाटे व आरूष सोहनी यांनी सहभाग घेतला होता. वृंदा सुतार हिने 15.05 गुण प्राप्त करून सुवर्णपदक प्राप्त केले तर निधी असबे ही 13.80 गुण प्राप्त करून पाचवी आली. अद्वैत खंबाटे याने 13.05 गुण प्राप्त करून पाचवा क्रमांक मिळविला तर आरूष सोहनी 12.60 गुण प्राप्त करून सहावा आला. खेळाडूंच्या यशाबद्दल हेवनचे संस्थापक रवी कुलकर्णी, प्रशिक्षक अलका तापकीर यांनी खेळाडूंचे कौतुक केले आहे.