पिंपरी-चिंचवड : निकाल जाहीर झाल्यापासून 30 दिवसांच्या आतमध्ये उमेदवाराला निवडणूक खर्चाचा हिशेब शपथपत्रासह सादर करणे बंधनकारक आहे. या कालावधीमध्ये खर्च सादर न केलेल्या 88 उमेदवारांना निवडणूक लढविण्यास अपात्र (अनर्ह) ठरविण्यात आले आहे. याबाबतचा निर्णय विभागीय आयुक्तांनी दिला आहे. तीन वर्षांसाठी बंदी घातलेल्या माजी नगरसेवकांमध्ये सुलोचना भोवरे, सीमा फुगे, प्रमोद ताम्हणकर, विमल काळे, जयश्री वाघमारे यांचा समावेश आहे.
महिला उमेदवारांची संख्या अधिक
विभागीय आयुक्तांनी तीनवर्षांसाठी बंदी घातलेल्या उमेदवारांमध्ये महिला उमेदवारांची संख्या अधिक आहे. अनर्ह उमेदवारांत मारूती सोनवणे, दयानंद शिंदे, सचिन लोंढे, शांताराम लोंढे, नितीन ओझरकर, सचिन ठाकूर, राहूल जाधव, तेजवीर जनवाल, शिल्पा कांबळे, संदीप सोनवणे, शुभांगी ढवळे, मालन खाडे, अलका नाईक, सबिता मेनन, कल्याणी वाळके, मंगेश बुरसे, रामदास तिटकारे, कोमल फुगे, पार्वती काकडे, नीलम लांडगे, विशाल लांडगे, करीश्मा बढे, सीमा बेलापूरकर, संतोश लांडगे, सुनीता लांडगे, दत्तात्रय गव्हाणे, मकरंद गव्हाणे, केशर गायकवाड, सरिता कांबळे, राहुल सस्ते, अझहर खान, तुषार सहाने, पूजा लांडगे, विद्या कुलकर्णी, संजय पवार, गंगा धेंडे, किर्ती जाधव, अशोक खरात, काशिनाथ जगताप, विजया जाधव, गोरखनाथ कदम, भिमाबाई तुळवे, रमेश गायकवाड, करण मामीडेशेट्टी, अरूणा पवार, अजय गायकवाड, रवी गायकवाड, संतोष तेलंगे, विलास कांबळे, मोहिनी वाघमारे, ललिता इराणी, अनिता वाळुंजकर, जया पाटील, मंजू जिरंगे, शोभा इंगळे, महादेव वाळुंजकर, युनुस अत्तार, नितीन बनसोडे, संतोष कुरवंत, अनिता पांचाळ, रंजना ओव्हाळ, किरण नढे, असिया शेख, अर्चना भालेराव, परशूराम गुंजाळ, भालचंद्र फुगे, हमीदा नदाफ, सुप्रिया गव्हाणे, सुदाम बाबर, सोनाली ओव्हाळ, ऐश्वर्या सावळे, संजय गायकवाड, कमल कांबळे, प्रशांत निकाळजे, उमा पांडुळे, पूर्वा साळुंखे, निलेश गागर्डे, सुरेश सकट, श्वेता इंगळे, पूर्वा निंबाळकर, पांडुरंग शित्रे, लिओ जुल्स, फिरोज मणियार.