मुंबई : महाविकास आघाडीच्या सरकारचे खातेवाटप महिन्याभरानंतर झाले. मात्र अजूनही मंत्र्यांना खातेवाटप करण्यात आलेले नाही. त्यामुळे सध्यातरी ३६ मंत्री बिनखात्याचे मंत्री म्हणूनच आहे. दरम्यान संभाव्य खातेवाटपाची यादी समोर आली आहे. काल बुधवारी मंत्रालयात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमवेत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक झाली. या बैठकीत खातेवाटप निश्चित झाले असून आज गुरुवारी संध्याकाळपर्यंत जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीच्या संभाव्य खातेवाटपाची यादी प्रसिद्ध केली आहे. यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थ खाते देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. आदित्य ठाकरे यांना पर्यावरण क्षेत्रात काम करण्याची आवड असल्याने त्यांच्याकडे पर्यावरण खात्याची जबाबदारी देण्यात येणार आहे.
संभाव्य खातेवाटपाची यादी-
एकनाथ शिंदे- नगरविकास, सार्वजिनक बांधकाम
सुभाष देसाई- उद्योग आणि खनिकर्म
बाळासाहेब थोरात- महसूल खातं
अशोक चव्हाण- सार्वजनिक बांधकाम
अनिल देशमुख- गृह खातं
जयंत पाटील- जलसंपदा
दिलीप वळसे पाटील- कौशल्य विकास आणि कामगार
जितेंद्र आव्हाड- गृहनिर्माण
नवाब मलिक- अल्पसंख्यांक
हसन मुश्रीफ- सहकार
धनंजय मुंडे- सामाजिक न्याय
अनिल परब- सीएमओ
उदय सामंत- परिवहन