हे लग्न करू नका, फसवणूक होईल म्हणत तरुणीच्या भावाला पाठवला बदनामीकारक मजकूर

Defamatory text sent to young woman’s brother to break up marriage : Crime against one भुसावळ : भुसावळ तालुक्यातील एका गावातील उपवधूच्या भावाला बदनामीकारक मेसेज पाठवल्याप्रकरणी अज्ञाताविरुद्ध सायबर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.

अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल
भुसावळ तालुक्यातील एका गावातील तरुणीचा साखरपुडा झाला असून तरुणीच्या भावाला एका संशयीत आरोपीने तरुणीसोबतच्या वराचे लग्न झाले असून त्यापासून त्याला मुलगीदेखील असल्याचा संदेश इंस्टाग्रामवरून पाठवला. हे लग्न करू नका, तुमची फसवणूक होईल, असा उल्लेखदेखील या संदेशात टाकण्यात आला असून लग्न होवू नये या उद्देशाने बदनामीकारक मजकूर पाठवणार्‍या अज्ञात इन्स्टाग्राम खातेधारकाविरुद्ध सायबर अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक लिलाधर कानडे करत आहेत.