मंत्रिपदाची आहुती
देशात 1954 पूर्वी स्त्रियांना मालमत्ता ग्रहण करता येत नव्हती. विभक्त राहून पतीपासून घटस्फोट मिळवता येत नव्हता. तिला पित्याच्या आणि पतीच्याही मालमत्तेतला हिस्सा मिळत नव्हता. बाबासाहेबांना ही असमानता संपवायची होती. त्यामुळे त्यांनी भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु यांच्या विरोधात जाऊन संसदेत हिंदू बिल कोड मांडले. हे बिल मांडताना त्यांनी मंत्रिपदाची आहुती दिली हे विसरता येणार नाही.
आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. पण देश स्वतंत्र झाल्यानंतर कायदेशीर कारभार खर्या अर्थाने सुरू झाला तो नव भारताच्या घटनेला, संविधानाला 26 नोव्हेंबर 1950 रोजी मान्यता दिल्यानंतर. देशाची घटना लिहिण्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ज्ञ अशा व्यक्तींची मसुदा समिती नेमण्यात आली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर या मसूदा समितीचे प्रमुख होते. त्यामुळे घटना लिहीण्याचे सारे श्रेय डॉ. आंबेडकरांना दिले जाते, असा काही लोकांचा आक्षेप आहे. पण घटनेचा मसुदा तयार होत असताना मसुदा समितीतील इतर सदस्यांच्या दृष्टिकोनाचा कधी उल्लेख होत नाही. किंबहुना त्याबद्दल कधी चर्चा होताना दिसली नाही. मसुदा समितीतील अनेक सदस्यांना त्यावेळी वेगवेगळी कारणे देत अंतर राखले होते. काही जणांनी आजारी असल्याचे सांगितले. काहींनी आपण शहरात नाही आहोत, बाहेरगावी आहोत असे कळवले. काही जणांनी तर बाबासाहेंबावरोवर काम करण्याची इच्छा नसल्याचे स्पष्ट केले. तरीसुद्धा या आणि इतर अनेक आव्हानांचा सामना करत प्रसंगी तत्कालीन बड्या राजकित नेत्यांविरोधात जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाची घटना लिहिण्याचे अवघड काम पूर्ण केले.
मागील दोन दशकांपासून देशात स्त्रियांना समानतेची वागणूक, त्यांना निरनिराळे अधिकार मिळायला पाहीजेत, थोडक्यात स्त्रि मुक्त झाली पाहिजे असल्याचे वारे वहात होते. पण देशाच्या संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी भारतीय स्त्रिला 1950 मोकळा श्वास घ्यायचे स्वातंत्र्य मिळवून दिले होते याचा उल्लेख होताना फारसे पाहायला मिळत नाही. हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी स्त्रीला अधिकार मिळवून दिला आहे आणि त्यासाठी त्यांनी आपले मंत्रीपद सोडण्यासही मागेपुढे पाहिले नाही. देशात 1954 पूर्वी स्त्रियांना मालमत्ता ग्रहण करता येत नव्हती. विभक्त राहून पतीपासून घटस्फोट मिळवता येत नव्हता. तिला पित्याच्या आणि पतीच्याही मालमत्तेतला हिस्सा मिळत नव्हता. बाबासाहेबांना ही असमानता संपवायची होती. त्यामुळे त्यांनी भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याविरोधात जाऊन संसदेत हिंदू बिल कोड मांडले. हे बिल मांडताना त्यांनी मिंत्रपदाची आहुती दिली हे विसरता येणार नाही. देशाच्या संसदेत बाबासाहेबांनी मंजूर करून घेतलेल्या अनेक विधेयकांमुळे आजच्या आधुनिक स्त्रिला त्याचा फायदा होत आहे. त्यामुळे स्त्रियांना समान पगार, कौंटुबिक संपत्तीत समान हिस्सा, गर्भवती स्त्रिला सहा महिन्यांची रजा मिळायला पाहीजे याची बाबासाहेबांनी देशाच्या संविधानात तरतूद केली. देशातील सर्वोच्च, राष्ट्रपतीपदावर एक महिला विराजमान झाली होती आणि त्याचा पाया बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून रचला होता.
संविधानाची रचना करत असताना बाबासाहेबांनी समाजातील प्रत्येक घटकाचा विचार केला होता. उपेक्षित कामगाराला त्याचे हक्क मिळवण्याचा संविधानीक अधिकार बाबासाहेबांनी मिळवून दिला. कामावर असताना निर्धारित वेळपेक्षा जास्त काम केल्यास ओव्हरटाइमचा मोबदला तोही प्रत्येक तासासाठी दुप्पट, 14 तासांऐवजी आठ तास काम असे अनेक कामगारहितोपयोगी कायदे बाबासाहेबांनी मान्य करायला लावले. प्रत्येक कामगार प्रत्येक वर्षी ज्याची आतुरतेने वाट बघतो तो बोनसही देण्यासाठी बाबासाहेबांनी मालकांना भाग पाडले. मालकाने कामगारांना बोनस का द्यावा, याची व्याख्या त्यांनी सोप्या भाषेत लिहून ठेवली आहे.
समाजाचा उद्धार करण्यासाठी बाबासाहेबांनी आपल्या कौटुंबिक अडचणी, दु:ख याचा अडसर कधी येऊ दिला नाही. त्या गोष्टी बाजूला सारत त्यांनी समाज सुधारणेला पहिले प्राधान्य दिले. याचे उत्तम उदाहरण म्हणजे बाबासाहेबांचा लाडका मुलगा राजरत्न याचा मृत्यू. राजरत्न याचा मृत्यू झाला त्याच दिवशी बाबासाहेबांना गोलमेज परिषदेसाठी इंग्लंडला जायचे होते. बाबासाहेबांच्या मोठ्या बंधूंनी, राजरत्नचा मृत्यू झाला आहे.. भीम तू कुठे निघालास? असा प्रश्न केला. त्यावर पुत्रवियोगाचे दु:ख बाजूला ठेवून बाबासाहेब म्हणाले की, मी जर लंडनला गेलो नाही तर कोट्यवधी अस्पृश, मागासवर्गीय लोकांच्या अधिकारांची हत्या गांधी अँड कंपनी करेल. माझ्या एका मुलासाठी मला इतर कोट्यवधी मुलांना मारता येणार नाही. बाबासाहेब इंग्लंडला गेले आणि देशातील अस्पृश्य, मागासवर्गीयांचे अधिकार शाबूत राहतील याची काळजी त्यांनी घेतली. त्यामुळे संविधान म्हटले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे नाव पुढे येणारच त्यात काही शंका नाही.
– जगदीप कांबळे
9967116328