‘जनशक्ती’चे वृत्त अखेर ठरले खरे ; जनतेत कारवाईचे उत्स्फूर्त स्वागत
जळगाव– तब्बल सात जणांच्या बळी घेणार्या नरभक्षक बिबट्याच्या मागावर वनविभाग असतानाच शनिवारी रात्री हैदराबाद येथील खाजगी शुटर्स नवाब शहापत अली खान यांच्या निशाण्यावर बिबट्याने आला अन् पहिल्याच गोळीत तो गारद झाल्याने चाळीसगावसह मालेगाव तालुक्यात आनंदाचे वातावरण पसरले. ‘हैद्राबादी नवाबाच्या निशाण्यावर बिबट्या’ या आशयाचे वृत्त दोन दिवसांपूर्वीच सोशल मिडीयावर ‘जनशक्ती’ने व्हायरल केले होते तर प्रत्यक्षात शनिवारी रात्री ते खरेदेखील ठरले. शनिवारी रात्री 10.20 वाजेच्या सुमारास झालेल्या या कारवाईचे वृत्त सोशल मिडीयावर व्हायरल होताच जनतेनेही या कारवाईचे स्वागत केले. चाळीसगाव तालुक्यातील लहान वरखेडे येथील शंकर तिरमली यांच्या शेतात बिबट्या असल्याची माहिती मिळाल्यानंतर खान यांच्यघासह पथकाने धाव घेतली तर रात्रं-दिवस मिशन बिबट्या असलेल्या खान यांनी आपल्या निशाण्याने एकाच गोळीत बिबट्याला गारद केले.
एक गोळी अन् बिबट्या गारद
तब्बल चार महिला व तीन निष्पाप बालकांचा बळी घेणार्या नरभक्षक बिबट्याच्या मागावर वनविभागाची यंत्रणा असतानाच जनक्षोभ उसळल्यानंतर वनविभागाने हैद्राबादचे खाजगी शुटर्स नवाब शहापत अली खान यांना पाचारण केले होते. तब्बल तीन दिवसांपासून खान हे बिबट्याच्या मागावर होते तर वरखेड खुर्द येथील लोकवस्ती असलेल्या भागात शनिवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास खान यांच्या रडारवर नरभक्षक बिबट्या आल्यानंतर त्यांनी आपल्या बंदुकीच्या पहिल्याच निशाण्यात बिबट्याला गारद केले.
आवर्तनाचा दिलासा अन् बिबट्याचा गेला बळी
दोन दिवसांपूर्वीच गिरणा धरणाच्या आवर्तनातून रब्बीच्या पहिल्या हंगामासाठी तब्बल दोन हजार क्यूसेस आवर्तन सोडण्यात आल्यानंतर शेतकर्यांना दिलासा मिळाला होता तर पाण्याच्या शोधार्थ पुन्हा गिरणा काठावर आलेल्या बिबट्या शनिवारी रात्री वरखेडे खुर्दच्या पट्ट्यात आलेल्या बिबट्याचा बळी गेल्याचे बोलले जात आहे. या घटनेचे वृत्त कळताच प्रांताधिकारी शरद पवार, आमदार उन्मेश पाटील, तहसीलदार कैलास देवरे, वनविभागाचे जिल्हा वनाधिकारी आदर्श रेड्डी, वनविभागाचे आरएफओ पवार, मोरे यांच्यासह अनेकांनी धाव घेतली. वनविभागाच्या अधिकार्यांनी बिबट्याचा ताबा घेत त्याला चाळीसगाव वनपरीक्षेत्राच्या कार्यालयात आणण्याची तयार केल्याने हजारोंचा जमाव रात्री उशिरापर्यंत गर्दी करून होता. आहे. गुरुवारी याचे मोठे पडसाद उमटण्याची शक्यता आहे तर राज्य पातळीवरील नेते येथे भेट देण्याची दाट शक्यता आहे. नरभक्षक बिबट्याच्या बंदोबस्तासाठी कुठल्याही उपाययोजना करा मात्र बंदोबस्त करा, या मागणीवर संतप्त जमाव कायम आहे. गुरुवारी या घटनेचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.