हैदराबाद पोलिसांना कडक सॅल्यूट; कौतुकाचा वर्षाव !

0

हैदराबाद: हैदराबादमधील वेटरनरी डॉक्टर प्रियांका रेड्डी यांच्यावर पाशवी बलात्कार करून जाळून ठार करण्यात. यावरून संपूर्ण देशात संतापाची लाट पसरली होती. आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी जनमानसात भावना व्यक्त होती. त्यानंतर आज सकाळी ज्या ठिकाणी बलात्कार झाला होता, त्याच ठिकाणी सर्व चारही आरोपींचे एन्काऊंटर करून ठार करण्यात आले आहे. जनमानसात आणि सोशल मीडियावर प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. पोलिसांचे कौतुक होत आहे. सामन्यांप्रमाणे बॉलिवूड सेलिब्रिटींनी तेलंगणा पोलिसांचे कौतुक केले आहे. ऋषी कपूर, अनुपम खेर यांनी ट्विटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिल्या आहेत.

हैदराबाद बलात्कार प्रकरणी अधिक तपासासाठी पोलिसांनी चारही आरोपींना घटनास्थळी नेले होते. त्यावेळी या आरोपींनी त्या ठिकाणाहून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांकडून त्यांना थांबवण्याचा प्रयत्नही करण्यात आला. परंतु ते न थांबल्याने पोलिसांकडून गोळीबार करण्यात आला.