हैदराबाद बॉम्बस्फोट प्रकरणी दोन आरोपी दोषी

0

हैदराबाद: न्यायालयाने २००७ मधील दुहेरी बॉम्बस्फोटाप्रकरणी आज मंगळवारी निकाल दिला. न्यायालयाने अनिक शफिक सईद आणि इस्माइल चौधरी या दोघांना दोषी ठरवले असून अन्य दोन आरोपींना न्यायालयाने सबळ पुराव्या दोषमुक्त केले आहे. हैदराबादमधील गोकूळ चाट आणि लुंबिनी पार्क येथे २५ ऑगस्ट २००७ रोजी बॉम्बस्फोट झाला होता.

या बॉम्बस्फोटामध्ये ५० हुन अधिक जखमी होते तर ४२ जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी हैदराबादमधील न्यायालयात खटला चालवण्यात आला. तेलंगणा पोलिसांनी या प्रकरणात तीन वेळा आरोपपत्र सादर केले. या प्रकरणात १७९ साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. या प्रकरणात एकूण पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. तर दोन आरोपी अजूनही फरार आहेत.

एका आरोपीच्या शिक्षेबाबत पुढील आठवड्यात सोमवारी निर्णय दिला जाणार आहे.