हॉकर्संनी पालकमंत्र्यांची भेट घेवून मांडल्या व्यथा

0

जळगाव : महापालिका प्रशासनातर्फे अतिक्रमण विभागातर्फे शहरात गेल्या पंधरा दिवसांपासून अतिक्रमण निर्मूलनाची मोहीम हाती घेतली आहे. या कारवाईच्या विरोधात हॉकर्स संघर्ष समितीने आज पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली. निवेदन देवून हॉकर्सवर अन्यायकारक होणार्‍या कारवाई थांबविण्याबाबत मागणी केली. यावेळी पालकमंत्री यांनी आयुक्तांना तातडीने बैठक घेवून यावर कायदेशीर तोडगा काढण्याच्या सूचना केल्या आहेत.

शहरातील नो हॉकर्स झोनमधील हॉकर्स धारकांवर कारवाईची मोहीम प्रशासनाने सुरु केली आहे. या कारवाईच्या विरोधात मनपासमोर तीन दिवस हॉकर्स संघर्ष समितीच सदस्यांनी उपोषण केले. तर 29 नोव्हेंबरला मुंबई येथे मंत्रालयावर मोर्चा काढला. आज पालकमंत्री पाटील यांची जिल्हाधिकारी कार्यालयात हॉकर्स संघर्ष समितीचे सदस्य रवींद्र महाजन, अशफाक बागवान, शकुंतला पाटील, होनाजी चव्हाण आदी पदाधिकार्‍यांनी भेट घेवून निवेदन दिले. तर मनपाकडून अन्यायकारक होणार्‍या कारवाई त्वरीत थांबवावी याबाबत मागणी केली. यात पालकमंत्री यांनी जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त किशोरराजे निंबाळकर यांना हॉकर्स सोबत तातडीने बैठक घेवून कायदेशीर बाजू तपासून तोडगा काढण्याच्या सुचना दिल्या.