हॉकर्सच्या मागण्यांसाठी मॅकेनिकल्स युनियनचे ठिय्या आंदोलन

0

जळगाव । हॉकर्सच्या विविध न्याय मागण्यांसाठी सेंटर ऑफ इंडियन लटेड युनियन (सलंग्न) मॅकेनिकल्स युनियनतर्फे गुरूवारी मनपाच्या प्रशासकिय इमारतीसमोर ठिय्या आंदोलन करण्यात येवून आयुक्त जीवन सोनवणे यांना निवेदन देण्यात आले. मागील महिन्यातील 27 फेब्रुवारी पासून शहरातील अजिंठा चौफुलीवरील हॉकर्स, टपरीधारक बेरोजगारी व उपासमारीमुळे होरपळत आहे. तसेच शहरातील गांधी उद्यान, खान्देश कॉम्प्लेक्स आदि ठिकाणावरील हॉकर्स ज्यांचा रस्त्याला कोणताही अडथळा नाही, त्यांना कारण नसतांना अतिक्रमण विभाग बेरोजगारीच्या विळख्यात लोटत आहे. चौपदरीकरणाच्या कामाला केव्हा सुरूवात करण्यात येईल, चौपरीकरणाच्या कामासाठी सर्व हॉकर्स, टपरीधारकांना हुसकावून लावत रस्ते मोकळे करण्यात आले परंतु कामाला प्रत्यक्षात सुरूवात न झाल्यामुळे अजिंठा चौफुलीवरील हॉकर्स, टपरीधारकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तेव्हा हॉकर्सच्या मागण्या मान्य कराव्या, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

अशा आहेत मागण्या: राष्टीय फेरीवाला धोरणाची काटेकोर अंमलबजावणी करून धोरणाच्या मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी करा., हॉकर्स, टपरीधारक यांच्यावरील अन्याय जप्ती दंडाची कारवाई बंद करा तसेच जप्त केलेले साहित्य काटे, लोटगाडी, कपडे, बाकडा ईत्यादी त्वरीत विना विलंब जाचक अटी-शर्ती न लादता परत करा., रस्ता चौपरीकरणाच्या कामाला त्वरीत सुरूवात करा आणि चौपरीकरणास सुरूवात करण्यास किती कालावधी लागेल याची संघटनेला माहिती द्या. गांधी उद्यान येथील हॉकर्सवर होत असलेली अन्याायकारक कारवाई त्वरीत मागे घ्या व त्यांना गाड्या लावण्यास मज्जाव बंद करा., नोटरी केलेल्या 100/-रू. रोख पावती मनपात जमा केलेल्या सर्व हॉकर्स टपरीधारकांना त्वरीत राष्लटीय फेरीवाला धोरणाअंतर्गत नियमानुसार ओळखपत्र द्या, अया मागण्या करण्यात आल्या आहे. मॅकेनिकल्स युनियनतर्फे प्रशासकिय इमारतीसमोर करण्यात आलेल्या आंदोलनादरम्यान आयुक्त व अतिक्रमण विभागाच्या अधिकार्‍यांविरोधात घोषणाबाजी करण्यात येवून निषेध व्यक्त करण्यात आला.